Monday, January 20, 2025

/

निवडणूक आली आणि चोरांची दिवाळी सुरू झाली

 belgaum

बेळगाव लोकसभा निवडणुकीचे वारे घोंगावत असताना एकीकडे पोलीस निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत तर दुसरीकडे चोरट्यांनी आपला मोर्चा शहरात आणि परिसरात वळवला आहे. मागील काही दिवसापासून चोऱ्या घरफोड्या या घटनेत वाढ झाली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काळात नागरिक घरातून बाहेर पडताना विचार करावा लागणार आहे. कोणतीही निवडणूक आली की चोरट्यांची दिवाळी सुरू होते असेच चित्र दिसून येत आहे.

शनिवारी रात्री चोरट्यांनी बेळगावात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कांदा मार्केट मधील पाच दुकाने फोडून चोरट्यांनी पाऊण लाखाचा ऐवज लांबविला. मध्यवर्ती बाजारपेठेत असणाऱ्या कांदा मार्केट परिसरात चोऱ्यांच्या सत्रामुळे अनेकजण भयभीत झाले आहेत. तर शहर आणि उपनगरात ही या चोऱ्या घरफोड्यांचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे कधी एकदा निवडणूक संपते रे बाबा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारा बरोबरच पोलिसांची दमछाक उडत आहे. दिनांक 23 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र तोपर्यंत चोरटे शहर आणि परिसरात आपला व्यवसायच जोरदार सुरू करत असल्याचे दिसून येत आहे. ही समस्या निवारण्यासाठी पोलीस खात्याकडे अधिक बळ नसले तरी याबाबतची दक्षता आणि चोरांचा तपास पोलीस प्रशासनासमोर एक आव्हानच आहे. प्रत्येक निवडणुकीत चोरट्यांची ची कारवाई गतिमानत होते यावर रोखण्यासाठी प्रशासन कोणती भूमिका बजावणार? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून आहे

आचारसंहिता सुरू झाल्यापासून चोरट्यांनी शहर उपनगर आणि ग्रामीण भागात धुडगूस घातला आहे. चोऱ्या घरफोड्या आणि चेन स्नॅचिंगचे प्रकारही वाढले आहेत. पोलीस प्रशासन बंदोबस्ताच्या कामात गुंतलेले असताना चोरट्यांनी आपला मोर्चा शहर आणि परिसरात वाढवला आहे. त्यामुळे ही परिस्थिती अशीच राहिली तर यापुढे नागरिकांचे जिणे मुश्कील होणार आहे. एका रात्रीत कांदा मार्केट परिसरात पाच दुकाने फोडून इतर ठिकाणीही चोऱ्या केल्या आहेत.

चोरट्यांना या चोरीत मोठे यश आले नसले तरी आणखी दोन दिवसात किती चोऱ्या आणि घरफोड्या होणार याकडे पोलिस प्रशासन लक्ष देणार का? हा प्रश्नही अंतर्मुख करणारा ठरणार आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. कांदा मार्केट परिसरात झालेल्या चोऱ्यांमुळे व्यापारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे. व्यापाऱ्यांनी चोऱ्यांच्या तक्रारी अनेक वेळा दिले असले तरी त्यांचा तपास अजून लागला नाही. त्यातच पुन्हा चोरी झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.