कर्नाटक राज्यातील दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये डीपी स्कूल ची विद्यार्थिनी रोशनी तेजस्वी तीर्थहल्ली हिने 622 गुणांसह राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. तिला दहावीच्या परीक्षेत एकूण 99.55 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. रोशनी ने भविष्यात डॉक्टर होण्याचा मानस बोलून दाखवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 620 गुण घेतलेले प्रीतम आणि अक्षता हे विद्यार्थी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
बैलहोंगल येथील ऑक्सफर्ड इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी प्रीतम चिकोप्प आणि बेळगाव येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुल ची विद्यार्थिनी अक्षता आय चुंचनूरमठ( रा. भडकल गल्ली) अशी त्यांची नाव आहेत.
केतकी ताम्हणकर आणि
केयुरी शानभाग या दोन विद्यार्थिनींनी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात दहावीत संयुक्त रित्या तिसरा क्रमांक मिळवला आहे.
शिक्षण खात्याने मीडियाला व्यवस्थित माहिती न दिल्याने शहरात जिल्ह्यात कोण प्रथम याचा अंदाज मीडियाला मिळाला नाही त्यामुळे रँकिंग बाबत अजूनही घोळ कायम आहे.