मित्रांसोबत फिरायला गेलेला युवक बुडल्याची घटना तिलारी जवळील जगमट्टी डॅम मध्ये बुडल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. सुरेश एस सरनोबत वय 27 रा. गणेश गल्ली कंग्राळी (के एच) असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.
सुरेश हा आपल्या इतर तीन मित्रांसोबत फिरायला म्हणून तिलारी धरणाकडे गेला होता चौघेही पोहायला उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला आहे.त्याला पोहायला येत नव्हते अशी देखील माहिती समोर आली आहे रविवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
सुरेश हा दुबईत एक कंपनीत कामाला होता तीन महिन्याच्या सुट्टी निमित्त तो बेळगावला आला होता रविवार इतर मित्रांना सुट्टी असल्याने तो तिलारीला फिरायला गेला होता.
सायंकाळी घटना होताच पोलिसांनी घटना तिलारीला भेट दिली मात्र सायंकाळी अंधार झाल्याने मृतदेह शोध कार्य सुरू केले नाही सोमवारी सकाळी मृतदेह शोधला जाणार आहे.