आज बेळगाव शहर उकाड्याने हैराण झाले आहे. दुपारी 12.30 पासून तापमान 35 अंश वर कायम असून उष्णता वाढत आहे.
बेळगाव शहर गरिबांचे महाबळेश्वर मानले जाते पण सध्या हे सिमेंट कोंक्रेट चे जंगल बनत चालल्याने उकाड्यात वाढ होत असून यावर्षी नागरिकांना उकाड्याचा जास्त त्रास होत आहे.
निवडणुकीचे वातावरण गरम होत असताना शहराचे वातावरण सुद्धा गरम होत असून दुपारच्यावेळी रस्त्यावरील वाहने व नागरिकांची संख्या कमी होत आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात आज पाऊस होण्याची शक्यता आहे उष्णतेच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पावसाची परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस पडून थोडाफार गारवा निर्माण व्हावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत मागील आठवडाभरात फक्त दोनच वेळा बेळगाव शहरात पाऊस झाला दुपारनंतर दाखल झालेल्या पावसाने वातावरण थंड केले होते आता पावसाची खरी गरज आहे अशी मागणी नागरिक करत आहेत त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे आणि वारंवार विजेचा खेळखंडोबा होत असल्यामुळे नागरिकांचे जगणे अवघड होऊन बसले आहे अशा स्थितीत पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आता लवकरच जून महिन्यापासून खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे पेरणीपूर्व मशागतीसाठी आता वळिवाचा पाऊस होणे गरजेचे आहे वळवाचा पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागत करणे सोपे जाणार आहे त्यासाठी पावसाने हजेरी लावावी अशी मागणी होत आहे