आज आपला देश आधुनिकतेच्या वाटेवर प्रगती करत असताना अजूनही देशातील अंधश्रद्धा कमी झालेंली नाही, असेच दिसून येत आहे. अमावश्या किंवा पौर्णिमा आली की भानामती करणाऱ्यांचे पेव वाढलेले दिसून येते. त्यामुळे अमावश्या आली आणि अशा भामट्याना विकृती सुचतेच.
बेळगाव आणि शहर परिसरात टोपली, लिंबु, गुलाल, हळद, भोपळा असे अनेक प्रकार करून ते रस्त्यावर टाकण्यात आल्याचे दिसून येते. मात्र ही विकृती थांबणार कधी असा सवालही उपस्थिती केला जात आहे. जर अशा गोष्टीना प्राधान्य देण्यापेक्षा समाजातील उपेक्षित नागरिकाना मदत केल्यास पुण्य लाभेल असेही मत काही जाणकारातून व्यक्त केले जातात.
बेळगाव आणि ग्रामीण भागात चौकाचौकात लिंबू आणि इतर भानामतीचे प्रकार दिसून येतात. मात्र अशा घटनांवर कोणाचेही लक्ष नसते आणि अशी मूर्ख माणसे कोणालाही न दिसता असे कृत्य करत असतात. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे
विकृती करणे आणि ती समाजाच्या हाताने घातक ठरणे ही धोक्याची घंटा आहे. मात्र आपला समाज अशाच गोष्टी मध्ये लक्ष घालून नकोते प्रकार करीत आहे,अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.