मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलेल्या आवाहनानुसार जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज भरून बेळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवार होण्याच्या अभियानात बेळगावच्या फक्त दोनच नगरसेवकांनी सहभाग घेतला आहे. वेडात मराठे वीर दौडले सात बाकीचे कुठे गेले? हा फिल्मी डायलॉग प्रसिद्ध आहे. मात्र मध्यवर्ती ने केलेल्या आवाहनांमध्ये फक्त दोनच नगरसेवक धावले आणि बाकीचे गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे? यापुढील काळात नगरसेवक आमदारकी तालुका पंचायत जिल्हा पंचायत आणि इतर निवडणुका लढवायच्या असतील तर या लोकसभेच्या निवडणुकीत आपला अर्ज भरून देशाचे लक्ष या प्रश्नाकडे लक्ष वेधावे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केले होते या आवाहनाला मान देऊन अनेकांनी आपल्या अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे काल एका दिवशी 13 जणांनी आपले अर्ज भरले तर आजही चाळीस ते पन्नास जण अर्ज भरण्याचे तयारीत आहेत.
ती प्रक्रिया सुरू आहे ,मात्र नगरसेवक विनायक गुंजटकर आणि विजय पाटील वगळता इतर एकही नगरसेवक यामध्ये पुढे आलेला नाही याबद्दल अर्ज करणाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये संताप आहे. नगरसेवक होऊन महानगरपालिकेत गेल्यानंतर आर्थिक लाभाची फळे उचलत असताना महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या आवाहनाला मात्र एकाही विद्यमान नगरसेवकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज भरणे या मागे एक मोठा उद्देश आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी नगरसेवकांनी प्रामुख्याने अर्ज भरावेत .अशी मागणी होती मात्र ही मागणी धुडकावून लावण्याचा प्रकार दिसून आला आहे विनायक गुंजटकर आणि विजय पाटील वगळता इतर नगरसेवक या अभियानात सहभागी न झाल्यामुळे बाकीचे नगरसेवक गेले कुठे? ते राष्ट्रीय पक्षांच्या नादाला लागले काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.