निवडणूक अर्ज भरणे ही किचकट प्रक्रिया असते.सर्वसामान्य माणसाला अर्ज भरणे कष्टदायक असते.यासाठी अर्ज भरण्यासाठी अनुभवी वकील उमेदवाराला मदत करणे गरजेचे असते.समितीच्या अनेक जणांनी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ केला आहे.पण अर्ज भरताना वकील नसल्यामुळे अनेक अडचणी उदभवत आहेत.
मराठी वकील संघटनेच्या सदस्यांनी उस्फूर्तपणे समिती कार्यालयात येऊन अर्ज भरणाऱ्यांना मार्गदर्शन करून बिनचूक अर्ज भरला जाईल हे पाहणे आवश्यक होते.पण मराठी वकिलांनी कार्यालयाकडे पाठ फिरवल्याचे दृश्य पाहायला मिळाले.मराठी वकील संघटनेच्या सदस्यांनी समिती कार्यालयात हजर राहून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या समिती सदस्यांना मार्गदर्शन आणि मदत करणे अपेक्षित होते.पण तसे काही झाले नाही.त्यामुळे अनेक अडचणींना तोंड देत उमेदवार अर्ज भरत आहेत.त्यामुळे त्यात चुका राहण्याची शक्यताही आहे.
हुतात्मा दिन,काळा दिन दिवशी पत्रक काढून मराठी वकिल संघटना पाठिंबा व्यक्त करते.त्यामुळे गरज असताना पाठ फिरवून मराठी वकिलांनी आपला रंग दाखवला आहे.पत्रके काढून पाठिंबा देण्याऐवजी अर्ज भरण्यासाठी मदत केली असती तर वेळ आणि मनस्ताप दोन्हीही वाचले असते अशी प्रतिक्रिया अर्ज भरण्यासाठी आलेल्या समिती कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.