गुढीपाडवा आणि गुडफ्रायडे निमित्ताने बेंगलोर बेळगाव बेंगलोर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात याव्या अशी मागणी सिटीजन कौन्सिल वतीने करण्यात आली होती.नैऋत्य रेल्वेचे मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक एम एस दिनेश यांना सिटीजन कौन्सिलचे सतीश तेंडुलकर,विकास कलघटगी,शेव्न्तिलाल शहा व अन्य सदस्यांनी निवेदन दिले होते. त्या निवेदनाची नैरुत्यत रेल्वेने दखल घेतली आहे. गुढीपाडव्यानिमित्त शुक्रवार दिनांक 5 रोजी रात्री अकरा वाजता बेंगळुरू येथून बेळगावला विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे.सदर गाडी दुसरे दिवशी सकाळी 11 वाजता बेळगावला पोहोचणार आहे. याचप्रमाणे रविवार दिनांक 7 रोजी बेळगाव रेल्वे स्थानकावरून सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी विशेष रेल्वे गाडी बेंगलोर कडे रवाना होईल.सदर गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता बेंगलोरला पोहोचणार आहे. सिटीजन कौन्सिलने केलेली विशेष गाड्यांची मागणी मान्य झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.
Less than 1 min.
Previous article
Next article