काल येळ्ळूर के एल इ जवळ झालेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.पण दुचाकीवाल्यानी पण वाहतूक नियमाप्रमाणे गेलं पाहिजे…. यासाठी खालील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
1) ज्यावेळी आपण वाहन चालवतो….त्याअगोदर आपल्या वाहनाच्या सर्व गोष्टी तपासाव्यात
2) प्रथम आपल्या वाहनाला दोन आरशे पाहिजेत एक डाव्या बाजूला आणि दुसरा उजव्या बाजूला
3) हे आरशे आपला चेहरा बघायला नसतात तर पाठीमागून कोणतं वाहन येतंय ते बघण्यासाठी असतात
4) तुम्ही सर्वसाधारण गावात असू दे किंवा गावाबाहेर असू दे आपले वाहन चालवताना शक्यतो होईल तेवढ्या डाव्या बाजूने चालवावे
( येळ्ळूर रोडवर शनिवारी रात्री अपघातात ठार झालेलो महिला)
5)गावात ओव्हरटेक करताना उजव्या बाजूने आणि हायवेला असाल तर दुचाकी वाहनांसाठी एक डाव्या बाजूला पांढरा पट्टा मारलेला आहे त्या मधूनच आपली दुचाकी चालवावी…
6) हायवेवर वाहन चालवताना चुकूनही दुसऱ्या लेन मधून आपली दुचाकी चालवू नये
7) आपल्याला समोरच्या गाडीला ओव्हरटेक करायचं आहे तर प्रथम आपण आपल्या दोन्ही आरश्यामध्ये बघावे….की पाठीमागून कोणते वाहन येते का…? आणि त्यानुसार निर्णय घ्यावा की आपण डावीकडून ओव्हरटेक करायचे की उजवीकडून….यासाठी आपल्या वाहनाला दोन्ही बाजूला आरशे असणे गरजेचे आहे….
8) हायवेला दुचाकी चालवताना डाव्या बाजूच्या लेनमधूनच आपली दुचाकी चालवावी
9) घराबाहेर पडताना आपली सर्व कागदपत्रे….गाडीचे आर सी बुक,इन्शुरन्स,लायसन्स,पलूशन सर्टिफिकेट….आहे की नाही ते तपासावे….
आपला जीव अनमोल आहे काळजी घ्या. …महादेव पाटील बेळगाव
Yes