आज महिलादिनी बेळगाव live ने समाजातील सामान्यातील सामान्य महिलांच्या संघर्षांची यशोगाथा जगासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलाय.
कर्ता पुरूष गेल्यानंतरही त्यांनी आपला संसार मोठ्या जिद्दीनं फुलवलाय. जन्मलेल्या बाळांना आंघोळ आणि लोकांची धुणी भांडी करून रहाटगाडा हाकत आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलंय. “एकला चलो रे” म्हणत परिस्थितीवर मात करणाऱ्या बेळगाव मधील मजगाव गावच्या अक्काताई गौडाडकर वय (65) व लक्ष्मी देसुरकर या माय लेकींची ही जिद्दीची कहाणी….
मजगाव लक्ष्मी गल्लीत राहणाऱ्या मायलेकीने आपल्या स्वावलंबनाच्या जोरावर केवळ आपला उदर निर्वाह यशस्वी केला नसून आपल्या नातवाला व मुलाला नामांकित कॉलेजमध्ये डिग्री पर्यंतचं शिक्षण देत आहेत.अक्काताई या मूळच्या जुने बेळगावच्या राहणाऱ्या आहेत त्यांच्या मागे कुणीच नसल्याने त्या आपल्या मुलीकडे गेल्या 25 हुन अधिक वर्षा पासून राहतात त्यांची मुलगी लक्ष्मी देसुरकर यांच्या पतीचे निधन देखील 20 वर्षा पूर्वी झालंय. मजगाव येथे घरात कुणीही करता पुरुष नसताना घरात या माय लेकिनी जीवनाचा गाडा यशस्वी रित्या चालवलाय.
आजी असलेल्या अक्काताई या टिळकवाडी अनगोळ मजगाव भागात जन्मलेल्या बाळांना तेल पाणी आंघोळ घालण्याचं काम करतात. तर त्यांची मुलगी लक्ष्मी या धुणी भांडी स्वयंपाक काम करत उपजीविका करतात.या दोघीनी हे तीन जणांचे कुटुंब चालवत दीपक देसूरकर या नातवाला जैन कॉलेज सारख्या नामांकित कॉलेज मध्ये बी एस सी डिग्रीचे शिक्षण देत आहेत.
एका सामान्य कुटुंबातील या दोघां अबला नारीनी आपला संसार उपजीविका स्वावलंबी करत यशस्वीरित्या चालवला आहे त्या दोघींना बेळगाव Live चा सलाम….