सर्व प्रकारचे अडथळे दूर करत बेळगाव मध्ये अनेक महिला यशस्वी वाटचाल करीत आहेत. स्वतः निवडलेल्या क्षेत्रात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. सामाजिक, क्रीडा आणि इतर कुठलेही क्षेत्र असो, त्यांनी आम्ही पुरुषांपेक्षा कमी नाही हेच दाखवून दिले आहे. यापैकी काही कर्तृत्ववान महिलांची बेळगाव live ओळख करून देत आहे.
आपले पती हर्षद यांच्याकडून प्रेरणा घेऊन तेजसा यांनी बाईकिंग ला आपली पॅशन बनवले आहे. बेळगाव मधील पहिली व्यावसायिक महिला बाईकर हा मान त्यांनी मिळवला आहे.
ब्रदरहूड ऑफ बुलेट्स मोटरसायकलिंग कन्सॉरटीयम ने आयोजित केलेल्या उदयपूर, राजस्थान येथील राईड मध्ये भाग घेणारी बेळगावची पहिली महिला होण्याचा मान ही त्यांनी मिळवला आहे. या राईड मध्ये एकटीने त्यानी 3000 किमी अंतरही पूर्ण केले आहे.
तेजसा या मॅड ओव्हर बाईक क्लब च्या सदस्य आहेत. महिलांना बाईक चालवण्यासाठी त्या प्रोत्साहन देतात. बायकिंग हे एक थ्रिल असून त्यासाठी तुम्ही पुरुष आहे की स्त्री याने काय फरक पडत नाही असे त्यांचे म्हणणे आहे.