Monday, December 23, 2024

/

उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त रहदारीत बदल

 belgaum

सोमवारी देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बेळगावला येत आहेत . व्हिटीयु येथे होणाऱ्या अठराव्या पदवीदान समारंभाला सोमवार दिनांक 18 रोजी ते उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने बेळगाव शहरातील रहदारीत बदल करण्यात आला आहे .सकाळी आठ ते दुपारी 2 पर्यंत रहदारी मध्ये बदल असणार आहे .
परीक्षांना बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सकाळी साडेआठपर्यंत आपापल्या परीक्षा केंद्रांवर हजर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती यांचा ताफा जाईपर्यंत रहदारी बंद झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला उशीर होऊ शकतो. त्यामुळे साडेआठ पर्यंत परीक्षेला हजर राहून विद्यार्थ्यांना आपली गैरसोय टाळावी अशी सूचना करण्यात आलेले आहे .

Venkaiah naidu
वाहनांना काही मार्गांवर बंदी असणार आहे त्यामध्ये सांबरा सर्कल, महतेशनगर ब्रीज, अशोक सर्कल सर्व भाजी मार्केट, अंडर ब्रीज बंद राहणार असून ओल्ड पीबी रोडमार्गे येडियुरप्पा मार्ग या सर्वांना जुन्या पी रोड वरून जाण्याची व्यवस्था आहे.
गोवा वरून येणार्या सर्व बस पीरनवाडी कॉर्नरला थांबवल्या जाणार असून कोल्हापूर गोकाक धारवाड येथून येणाऱ्या बस अशोक नगर येथे थांबवल्या जाणार आहेत .
धर्मनाथ सर्कल पासून सिटीबस सेवा असेल अवजड वाहनांची वाहतूक 17 व 18 या दोन दिवशी सकाळी सात ते रात्री आठपर्यंत बंद करणार आहे .
गोवा खानापूर मार्गे येणाऱ्या बस देसुर मार्गे किंवा जाऊ शकतील. पहिले व दुसरे गेट सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत पूर्ण बंद राहणार आहेत. बेळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4ए वर कोणत्या प्रकारची पार्किंग केले जाणार नाही .
त्याचबरोबर सम्राट अशोक सर्कल ते राणी चन्नम्मा सर्कल ,कॉलेज रोड ,खानापूर रोड , काँग्रेस रोड महामार्गावरील रहदारी नियंत्रणाच्या दृष्टीने पार्किंग ठेवले जाणार नाही. विजापूर बागलकोट कडून येणाऱ्या वाहनांनी मारिहाळ पोलिस स्टेशन कडून सुळेभावी रोड हा रस्ता पकडून पुढे जायचे आहे.
त्या सर्व बदलांचा विचार करून नागरिकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

1 COMMENT

  1. एका उपराष्ट्रपती साठी किती हा नारिकाना त्रास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.