Monday, December 23, 2024

/

दोन वर्षांची कमाई अवघ्या अर्ध्या तासात लुटली

 belgaum

गवंडी काम करून आपल्या दोन वर्षांची कमाई साठवून ठेवली, ही रक्कम रक्कम अवघ्या अर्ध्या तासात लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे हिंडलगा सुळगा परिसरात खळबळ माजली आहे.

हिंडलगा सुळगा येथील लक्ष्मण देवगेकर यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे. लक्ष्मण हे गवंडी काम करतात. मागील दोन वर्षांपूर्वी पासून त्यांनी काबाडकष्ट करून सुमारे 3 लाख रुपयांची पुंजी जमा केली होती. आपल्या स्वप्नातील काही कामे ते करणार होते. मात्र चोरट्यानी त्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी केली आहे.

दुपारी लक्ष्मण हे कामाला गेले होते काही कामानिमित्त ते घरी परत आले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते आपल्या घरगुती कामा निमित घराबाहेर पडले होते. ते आपले काम आटोपून घरी परतले त्यावेळी अवघ्या अर्ध्या तासात चोरट्यानी घरात चोरी केली आहे.

रोख रक्कम बरोबर सोन्या चांदीचे दागिनेही लांबविण्यात आले आहेत. काकती पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.