कणबर्गी येथील तलाव शेतकऱ्यांना जनावराना पाणी पिण्यासाठी इतर कामासाठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कणबर्गी शेतकऱ्यांनी केली आहे.
स्मार्ट सिटी निधीतून कणबर्गी येथील तलावाचे सौन्दर्यीकरण केले जात आहे सध्या या तलावात तलावात शिरण्याच्या दोन्ही बाजूला मातीचे ढिगारे ओतून तलाव बंद केला आहे व शेतकर्यांच्या जनावरांना पाणी पिण्यासाठी व जनावरे धुण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे याचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे.
तलावाचे सौन्दर्यीकरण करा मात्र शेतकऱ्यांना जनावरांसाठी जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी करत शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन शिवाजी सुठंकर यांच्या उपस्थितीत मातीचे ढिगारे हटवून मार्ग मोकळा केला. कणबर्गी तलावात दररोज अंदाजे पाच हजार जनावरे,दोन हजार बकरी येथील पाण्याचा वापर करतात आमचा सौन्दर्यीकरण विरोध नाही पण जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करून स्मार्ट सिटी योजना राबवा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी दिला आहे.