मार्कंडेय नदी काठावर वसलेल्या राकसकोप या छोट्याशा गावातील नागरिकांना गावात दारूबंदीचा निर्णय हवा आहे. यासंदर्भात गावाने लढा सुरू केला आहे .आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हे गाव दारुड्यांनी भरलेले असते. त्यामुळे दारूची विक्री आणि वापर बंद व्हावा असे ग्रामस्थांच्या मागणी आहे.
या गावची लोकसंख्या बाराशे आहे. तेथे राकसकोप धरण आहे. त्याबरोबर निसर्गरम्य वातावरण आहे .बेळगाव शहराला पाणीपुरवठा हेच गाव करते शनिवार रविवारी या भागात शहरातून तरुण आणि नागरिक जातात .सहलीसाठी आल्यानंतर दारू पिऊन दंगा घातला जातो. गोंधळ होतो, मारामाऱ्या होतात, यामुळे आता दारूबंदीचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत हे गाव आले आहे.
गाव बिजगरणी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते या गावच्या अध्यक्ष रेणुका नेमानि मोटार यांनी आता गावात दारूबंदीचा निर्णय घेण्याची तयारी चालू केलेली आहे. ग्रामपंचायत ठराव करून निर्णय घेतला जाणार आहे .लोकसभा निवडणुकीनंतर या कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती मिळाली आहे.