बेळगाव आणि चिकोडी मतदार संघात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांनी उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर केली असली तरी अंतिम उमेदवार कोण असावा या बाबत सहमती न झाल्याने दिल्ली दरबारी हाय कमांडना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
मागील लोकसभेत बेळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांपैकी एक जागा भाजप तर एक काँग्रेसने जिंकली होती.चिकोडी आणि बेळगाव भाजपची उमेदवारी मागील वेळी लढलेल्या सुरेश अंगडी आणि रमेश कती यांनाच देणार की यात बदल होणार याबाबत कुतुहुल लागले आहे.
भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव जिल्ह्यातील दोन्ही तिकिटे 20 मार्च रोजी अंतिम होणार असल्याची माहिती मिळाली आहे.शनिवारी उशिरा 11 एप्रिल रोजी मतदान असलेल्या जागांची तिकिटे तर 18 मार्च रोजी 17 एप्रिल रोजी मतदान असणाऱ्या मतदार संघाची तिकिटे तर 20 मार्च रोजी 23 एप्रिल रोजी मतदान असणाऱ्या उमेदवारांची तिकिटे जाहीर होतील असं देखील भाजप सूत्रांनी म्हटले आहे.
बेळगाव जिल्ह्यात भाजपची दोन्ही तिकिटे लिंगायत समाजालाच द्यावी की त्यातील एक ओ बी सी समाजाला द्यावे याबाबत देखील विचार मंथन सुरू आहे.इतर लिंगायत उमेदवारां सोबत ओ बी सी ला उमेदवारी द्यायची असल्यास बेळगावातून ओ बी सी मधून पर्याय म्हणून माजी खासदार अमरसिंह पाटील,माजी आमदार संजय पाटील व ए जी मुळवाडमठ यांच्या नावाची देखील चर्चा झाली आहे.राज्य कार्यकारिणीतुन बेळगाव चिकोडी साठी दोन दोन संभाव्य नावे पाठवली जाणार आहेत त्या नंतर दिल्लीत सेंट्रल इलेक्शन कमिटी एका नावावर शिक्का मोर्तब करणार आहे.