मच्छे येथील सरकारी कन्नड-मराठी प्राथमिक शाळेच्या आवारात शिक्षण खात्यातर्फे वाढीव खोलीच्या बांधकामाचे काम सुरू आहे. मात्र ग्रामस्थांनी याला विरोध केला आहे.
आधीच शाळेच्या आवारात खेळण्यासाठी मैदान नाही, उर्वरित जागेत आणि बांधकाम झाल्यास विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागा मिळत नाही. अशी तक्रार करून ग्रामस्थांनी हे बांधकामाला विरोध केला होता मात्र पुन्हा कंत्राटदाराने आज हे बांधकाम सुरू केल्यामुळे जिल्हा पंचायत शिक्षण समितीचे प्रमुख रमेश गोरल यांच्याकडे तक्रार करण्यात आली, रमेश गोरल यांनी तातडीने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दाखल होऊन या प्रकाराची दखल घेतली असून निवडणूक होईपर्यंत काम थांबवा अशी सूचना कंत्राटदारांना केली आहे .
शाळा इमारतीच्या वरच्या मजल्यावर ही वाढीव खोली बांधा आणि समोरील जागा मोकळी ठेवा अशी नागरिकांची मागणी आहे .त्यामुळे हा वाद निर्माण झाला असून आता निवडणूक झाल्यानंतरच याबद्दलचा निर्णय होऊ शकणार आहे.यावेळी मच्छे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.