बेळगावचा सुपुत्र शिवराज चव्हाण याने अभिनय केलेला ‘कॉलेज डायरी’ या मराठी चित्रपटाला बेळगाव शहरात चित्रपट गृहातून प्राईम टाईम मिळत नव्हता यासाठी बरेचशे प्रयत्न झाले होते मात्र यश मिळत नव्हतं शेवटी दोघांच्या मदतीने हे शक्य झालं आहे.
श्री राम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रयत्नातून थिएटर संचालक महेश कुगजी यांच्या मदतीने कॉलेज डायरी आता प्रकाश या 4 के साऊंड सिस्टम असलेल्या चित्रपटात रिलीज होणार आहे.
कॉलेज डायरी चित्रपट 15 मार्च पासूनचा 3:30 प्रकाश मध्ये झळकणार आहे.या अगोदर मुंबईत मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळत नसल्याने संघटना आक्रमक झाल्याचे पाहिलंय. अनेक दर्जेदार चित्रपट निर्माण होत आहेत त्यामुळे बेळगावात मराठी चित्रपटांकडे सिने रसिक देखील वळण्याची गरज बनली आहे
संपूर्ण बेळगांवकरांकडून व कॉलेज डायरी टीम रमाकांत कोंडुसकर व महेश कुगजी , संतोष दादा कामुले , शाहीरराव अभिजित कालेकर आणि सर्व राम सैनिकांचे आभार मानतो.सीमा भागातील मराठी जनतेने हा चित्रपट आवर्जून पहावा असे आवाहन कलाकार शिवराज चव्हाण यानें बेळगाव live कडे दिली आहे.