पांगुळ गल्लीतील रस्ता डांबरीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे यावर्षीचे रंगपंचमीतील भाविकांचे लोटांगण गुळगुळीत रस्त्यावरून होणार आहे.गतवर्षी दिवाळी सणानंतर पांगुळ गल्लीत मास्टरप्लॅनच्या कामास प्रारंभ झाला होता.भूमिगत विजवाहिनी, जलवाहिनी, गॅसवाहिनीचे व भुयारी गटारींचे काम पूर्ण झाले असून रस्ता डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
होळी सणाला पांगुळ गल्लीत अश्वथामा मंदिर भोवताली लोटांगण घालण्याची परंपरा आहे. रस्त्याचे काम होळीच्या आधी पूर्ण झाले नाहीतर यंदा लोटांगण विधीत अडथळा निर्माण झाला असता, त्यामुळे रस्त्याचे काम होळीसणाच्या आधी पूर्ण करण्यात आले आहे.
दरवर्षी या लोटांगण कार्यक्रमासाठी शेकडो भाविक गर्दी करतात.
मागण्या करून ती पूर्ण झाल्या की लोटांगण घातले जाते. या सणात या विधीला विशेष महत्व असते. पूर्वी येथील रस्ता अरुंद होता तसेच खराब झाला होता पण भाविक आपली परंपरा जपत होते, पण यंदा भाविकांसाठी चांगल्या रस्त्याची सोय झाली आहे.
मास्टरप्लॅनच्या कामास विरोध झाला पण नागरिक तयार झाले असून याचा चांगला फायदा झाला आहे. पांगुळ गल्ली ही एक मीनी होलसेल मार्केट म्हणूनही ओळखली जाते यामुळे येथे कायम गर्दी असते, या गर्दीत खराब रस्ता अडचणींचा ठरत होता पण यापुढे तसे होणार नाही, मात्र वरचेवर डागडुजी आणि काळजी घेत राहावी लागणार आहे. बेेेळगाव शहराची मोठी व्होलसेल बाजारपेठ असलेल्या पांगुळ गल्लीतील रस्त्याचे डाम्बरी करणं झाल्याने व्यापारी वर्गातून देखील समाधान व्यक्त होत आहे.