जिल्ह्यासह शहर परिसरात ऑनलाईन जुगाराचे पेव फुटले आहे. यामध्ये शाळकरी मुलांसह तरुण, नोकरदार मंडळीसह मोठी मंडळीही गुरफटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पोलिसासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. वेगवेगळ्या जुगारामध्ये दररोज लाखांची उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे.
बिंगो, रमी, रेस, तिनपत्ती आणि यासह आणखी काही जुगारी डाव मोठ्या प्रमाणात खेळण्यात येत आहेत. शहर आणि जिल्ह्यात हे डाव मोठ्या प्रमाणात खेळण्यात येत आहेत. जुगारचे अनेक डाव आता ऑनलाइन खेळण्यात येत असल्याने पोलिसांना याचा थांगपत्ता लागणे कठीण जात असल्याचे दिसून येत आहे.
काहींनी या आपल्या सोईनुसार ऑनलाइन जुगारच्या ऍप्स विकसीत केले आहेत. ज्यांना जुगार खेळायचे असल्यास अधिकृत सभासद व्हावे लागते. त्यानंतर काही ठराविक डाऊन पेमेंट जुगार अड्डाचालकाना भरावे लागते. त्यानंतर संबंधितात मोबाईल वर ऑनलाइन जुगाराचे ऍप्स डाउनलोड करून हे खेळ खेळता येतात.
घरबसल्या कोणत्याही प्रकारचे जुगारचे खेळ खेळता येतात. कितीही पैसे आणि केव्हाही हे जुगार खेळता येतात. ज्याच्याकडे स्मार्ट फोन नसलेल्याना थेट जुगार अड्ड्यावर जाऊन जुगार चालकाच्या मोबाईल वर किंवा संगणकावर खेळण्याची सोय केली आहे.
सध्या बेळगावात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन जुगाराचा खेळ सुरू आहे .त्यामुळे यावर रोख घालण्यासाठी पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑनलाईनचे जाळे वाढत असून तरुण आणि नोकरदार वर्ग गुरफटून जात असून यावर वेळीच रोख ठेवण्याची गरज आहे.