बेलगाम रेलवे स्टेशन के विकास के लिए निविदा नहीं लेकिन आधारशिला रख दी गयी है।
अभी तक बेलगाम रेलवे स्टेशन के विकास के लिए कोई निविदा आमंत्रित नहीं की गई है लेकिन सांसद सुरेश अंगडी ने पिछले दिनों इसकी आधारशिला जरूर रख दी।
रेलवे फाटक आरओबी के लिए आधारशिला रखकर 45 दिनों से अधिक का समय हो गया है लेकिन वहां कोई काम शुरू नहीं हुआ है। अंगडी ने कहा कि प्रशासन को काम शुरू करने के लिए कहा गया है।
स्टेशन के नए भवन के विकास के संबंध में अभी तक कोई निविदा नहीं निकाली गई है। कुछ भी निश्चित नहीं है कि कार्य कब शुरू होगा। पूरी प्रक्रिया के लिए 4 से 9 महीनों से कहीं अधिक समय लग सकता है।इससे स्पष्ट है कि आधारशिला समारोह नागरिकों के लिए एक चश्मदीद के रूप में किया गया था।
बातमी मराठीत असे
निविदा नसताना झाले उद्घाटन, कामाचा पत्ता नाही
बेळगाव रेल्वे स्थानकाचे इमारत नवीन बांधणार आहे असे सांगून खासदार सुरेश अंगडी यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेस्थानकावर मागील आठवड्यात उद्घाटन झाले. मात्र अद्याप या कामासाठी निविदा काढलेली नसल्याचे उघड झाले आहे त्यामुळे कामाचा अजिबात पत्ता नाही. निवडणुकीच्या तोंडावर श्रेय लाटण्यासाठी खासदार यांनी हा प्रकार केल्याचा आरोप होऊ लागला आहे. एक मोठा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमात संपुर्ण बेळगाव बेळगाव रेल्वे स्थानकाचे बांधकाम करणार, उत्तर आणि दक्षिण असे दोन दरवाजे लावण्यात येतील, तसेच गुडशेड हलवण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही याचा आढावा माध्यमांनी घेतला असता या कामासाठी निविदा सध्या काढलेली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे खासदारांचा बनावट कारभार समोर आला आहे .
निवडणुकीच्या तोंडावर विकास कामे करत असल्याचे सांगून लोकांना भुलवण्याचा प्रयत्न जोरदार सुरू आहे या कामात खासदारांनी आपली शक्ती वाया घालवले असल्याचे उघड झाले असून यामध्ये रेल्वे प्रशासनाला दबावात ठेवण्यात आले होते. याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.