सर्व प्रकारचे अडथळे दूर करत बेळगाव मध्ये अनेक महिला यशस्वी वाटचाल करीत आहेत. स्वतः निवडलेल्या क्षेत्रात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. सामाजिक, क्रीडा आणि इतर कुठलेही क्षेत्र असो, त्यांनी आम्ही पुरुषांपेक्षा कमी नाही हेच दाखवून दिले आहे. यापैकी काही कर्तृत्ववान महिलांची बेळगाव live ओळख करून देत आहे.
लग्नानंतर काहीतरी करीअर कराव अशी इच्छा होती. शालेय जीवनापासूच लिखाण आणि वक्तृत्व स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली. संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले. काॅलेज मध्ये एन एन एस मुळे संघटन आणि नेतृत्व गुण विकसित झाला. मात्र संसाराची जबाबदारी पडल्यावर तब्बल सोळा वर्षे फक्त कुटुंबाला प्राधान्य दिले. यावेळी फक्त एक पत्नी आणि आई एवढीच ओळख होती.. दै. सकाळ मध्ये मधुरांगण संयोजिका म्हणून स्वतःची ओळख मिळाली. त्यानंतर इन बेलगाम वृत्तवाहिनीचे संपादक राजशेखर पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे आज गेली सहा वर्षे आपली मराठीसाठी बातम्या लिहीत आहे.
दरम्यान दै तरुण भारतच्या सोशल मिडिया मध्ये काम करण्याची संधी मिळाली. हा सर्व प्रवास सुरु असताना नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र बेळगाव जिल्हा शाखेचे प्रवक्ता पद सांभाळत आहे. नुकतेच निपाणी तालुक्यातील बेडकीहाळमधील कै. बसवंत नागूू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट कडून कित्तुर राणी चन्नम्मा कर्नाटक राज्यस्तरीय प्रेरणा गौरव आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जिजामाता महिला मंडळाच्या माध्यमातून समाजकार्य देखिल करीत आहे.
नाव : सौ. निलिमा मनोहर लोहार
पत्ता: घ नं 723, ज्योतीनगर, मेन रोड , कंग्राळी खुर्द , ता . जि. बेळगांव
शिक्षण : बी काॅम