Sunday, December 22, 2024

/

राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ

 belgaum

नवव्या एम के नम्बीयार स्मृती राष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेला बेळगावात दि.८ मार्चपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती के एल एस संस्थेच्या राजा लखमगौडा कायदा महाविद्यालयाच्या प्राचार्या संध्या एच.व्ही.यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दि.८ आणि ९ मार्च अशी दोन दिवस ही स्पर्धा चालणार आहे.कर्नाटक,महाराष्ट्र,तामिळनाडू आणि तेलंगणा येथील वीस संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.एका संघात तीन विद्यार्थी असणार आहेत.चाळीस वकील या स्पर्धेत न्यायमूर्तींची जबाबदारी संभाळणर आहेत.

राष्ट्रीय लॉ युनिव्हर्सिटीचे प्रा.टी. रामकृष्ण स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन एम.आर.कुलकर्णी भूषावणार आहेत.समारोप कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एच.पी.संदेश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.ऍटर्नि जनरल के के वेणूगोपाल हे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.