बेेेळगाव येेेथील मराठा लाईट इंफंट्रीचे हवालदार सोनबा गोंगाने याने मंगोलिया येथे झालेल्या एशियन कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावत बेळगावचा झेंडा पुन्हा एकदा उज्वल केल आहे.
मंगोलिया येथे 23 वर्षा खालील सीनियर कुस्ती स्पर्धेत हे यश संपादन केलं आहे.
21 ते 24 मार्च या काळात मंगोलियात आयोजित स्पर्धेत हवालदार सोनबा तानाजी गोंगाने(23 मराठा एल आय) याने 23 वर्षा खालील 61 किलो वजन फ्री स्टाईल गटात रौप्यपदक पटकावले आहे.
सोनबा याने मंगोलिया कझाकस्तान आणि येमेनच्या पैलवानाला पराभूत करत रौप्य पदक पटकावले तर सुवर्ण पदकाच्या लढतीत कऱ्यागस्तानच्या उलुकबेक झोडोसबेक याच्या कडून पराभव स्वीकारावा लागला.
पैलवान सोनबा हा मराठा सेंटर मध्ये प्रशिक्षण सराव करत असतो सेंटर मध्ये उत्तम दर्जाची होणारी शारीरिक कसरत आणि व्यायाम त्याला मिळाल्याने त्यानं हे यश संपादन केलंय युवकांना याचा आदर्श घयायला हरकत नाही. मराठा सेंटरचा अधिकाऱ्यांनी त्याच या यशा बद्दल अभिनंदन केले आहे.