महाराष्ट्र एकीकरण समिती लोकसभा निकडणुकीच्या बाबतीत मराठी मतदारांना कोणता आदेश देणार याकडे बऱ्याच जणांचे लक्ष लागून राहील आहे.यावेळी मराठी विरोधी असलेल्या राष्ट्रीय पक्षांना मतदान बहाल करण्या ऐवजी समितीने निवडणूक लढवावी किंवा अधिकाधिक उमेदवारी अर्ज दाखल करून प्रश्न राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवावा व आपली वोट बँक राष्ट्रीय पक्षांच्या गिधाड झडपे पासून वाचवावी अशी मागणी अनेक युवकांनी समिती नेतृत्वाकडे केली आहे. निवडणुकी बाबत नोटा पर्याय स्वीकारावा की खुली सूट द्यावी याची चर्चा देखील बैठकीत होणार आहे.
मध्यवर्ती समितीच्या सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार समिती नेतृत्वाकडे निवडणूक लढवण्या बाबत जनतेतून दबाव वाढत चालला आहे कशी मराठी वोट बँक राष्ट्रीय पक्षा पासून सेव्ह केली जाईल यावर नेतृत्वाला विचार करणे भाग पाडले जात आहे या बाबत अनेक युवकांनी समिती नेतृत्वाकडे मागणी देखील केली आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बैठक बुधवार २७ मार्च २०१९ रोजी संध्याकाळी ४.०० वाजता मराठा मंदिरात आयोजित करण्यात आले आहे.महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक बोलावण्यात आली आहे. सर्व सभासदांनी वेळेवर बैठकीला हजर राहून चर्चेत भाग घ्यावा असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली आहे.