कोल्हापूर येथील सभा संपवून बेळगावकडे येऊन विमान मार्गाने मुंबईला निघालेले युती चे जोडीदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बेळगावच्या सांबरा विमानतळावर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत होते शिवसेनेचे उजळते तारे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे.
या महनीय व्यक्तींची भेट घेतली मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले आणि चर्चा झाली.
उच्चाधिकार समिती बैठकीत झालेल्या निर्णयांचा पाठ पुरावा करा अशी प्रमुख मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उद्धवजी कडे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना खासदार अनिल देसाई, आमदार राजेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
29 एप्रिल नंतर मुंबई भेटीला या असेही उद्धवजी यांनी समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले.
यावेळी प्रकाश मरगाळे, दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, अरविंद पाटील, विजय पाटील, मनोहर आंबेवाडीकर, विकास कलघटगी, शुभम हंडे, प्रकाश बापू पाटील,शिव सेनेचे प्रकाश शिरोळकर, दिलीप बैलूरकर आदी उपस्थित होते.
बेळगाव गरम करा -अनिल देसाई
गेल्या काही दिवसां पासून बेळगाव थंड झालं आहे मराठीच्या मुद्द्यांवर बेळगाव आक्रमक करा सीमा लढा आणखी तीव्र करा नेहमी शिव सेना सीमा बांधवांच्या पाठीशी असेल असे आश्वासन सेना खासदार अनिल देसाई यांनी दिला आहे.