Sunday, December 22, 2024

/

एस एस एस एफचा प्रवीण मजुकर बनला बेळगाव श्री किताबाचा मानकरी

 belgaum

एस एस एस फौंडेशनच्या प्रवीण मजुकर यानें आपल्या पिळदार शरीर यष्टीचं दर्शन घडवत मराठा युवक संघ आयोजित जिल्हा स्तरीत बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मानाचा ‘बेळगाव श्री’हा किताब पटकावला तर एस एस फौंडेशनच्याच एस गंगाने याला बेस्ट पोझर हा किताब मिळाला.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मराठा मंदिरात विजेत्या खेळाडूंना किताब बहाल करण्यात आले.

विविध गटातील पहिले तीन विजेते खालील प्रमाणे आहेत

80 हुन अधिक वजन किलो गट
विकास सूर्यवंशी(कार्पोरेशन जिम)
रोहित चव्हाण(ओलांपिया जिम)
प्रसाद बाचीकर(एस एस एफ)

80 किलो गट
गजानन काकतीकर(पोलिहेड्रोन जिम)
करणं देसुरकर(एस एस एस एफ)
शुभम कोचेरी(एकंट्रीम जिम)

75 किलो गट
प्रवीण मजुकर(एस एस एस एफ जिम)
नागेंद्र मडीवाळ (एस एस एस एफ जिम)
विक्रांत धामणेकर (एस एस एस एफ जिम)

70 किलो गट
सुनील भातकांडे (एस एस एस एफ जिम)
राजू हिंगलाजे (एस एस एस एफ जिम)
केदार पाटील (पोलिहेड्रोन जिम)

65 किलो
प्रताप कालकुंद्रीकर (एस एस एस एफ)  सतीश कांबळे(मोरया जिम)
आदित्य काटकर (एस एस एस एफ जिम)

60 किलो गट
प्रमोद गौडवाडकर (एस एस एस एफ जिम)
विवेक पोटे (समर्थ जिम)
प्रसाद चव्हाण(बॉडी टोन जिम)

55 किलो गट
उमेश गंगाने (एस एस एस एफ जिम)
निलेश मोहिते (फ्लेक्स जिम)
जोतिबा गावडे(बॉडी टोन जिम)

मराठा युवक संघ यांच्यावतीने आयोजित 53 व्या जिल्हास्तरीय बेळगाव श्री शरीरसौष्ठव स्पर्धेला मंगळवारी मोठ्या उत्साहात सुरवात झाली होती. मराठा मंदिरच्या सभागृहात या स्पर्धेला सुरुवात झाली असून 50 हुन अधिक शरीरसौष्ठव पटूंनी यात भाग घेतला प्रतिसाद दिला होता

प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एच जी राघवेंद्र सुहास, संजय सुंठकर, शिवाजी हंगिरगेकर, सिद्धर्थ हुंदरे, लक्ष्मण होनगेकर, सचिन सबनीस, परशराम शहापुरकर, संजय मोरे, शिवाजी हंडे, सुधीर दिवेकर, सदानंद शिनोलकर, विजय बोगाळे, सुनील भोसले, श्रीकांत देसाई, शेखर हंडे, मारुती देवगेकर आदी होते. अध्यक्ष स्थानी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर होते.

प्रारंभी पुलवामा येथील झालेल्या भ्याड हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नेताजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पयजन करण्यात आले. संजय सुंठकर यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

मंगळवारी झालेल्या स्पर्धेचे पंच म्हणून अजित सिद्दन्नावर, शिवकुमार शिंदे, संघटनेचे अध्यक्ष एम के गुरव, सेक्रेटरी एम गंगाधर, अनिल आंबरोली, वासुदेव साखळकर, अनंत लंगरकांडे, सुनील राऊत, नूर मुल्ला, बसवराज हरलीमट्टी, अनंत प्रधान, आकाश लेहाल, सुरेश धामणेकर, आदींनी काम पाहिले. मंगळवारी विविध 9 गटात ही स्पर्धा सुरू होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.