बुधवारपेठ टिळकवाडी येथील महात्मा फुले उद्यानाचे स्मार्ट सिटी योजनेतून सुशोभीकरण केले जात आहे.
2.71 कोटी रुपयांचा निधी यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
नऊ महिन्यात हे काम पूर्ण होणार असून त्यासाठी नवीन टेंडर काढण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर महात्मा फुले मैदान वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीनी सजले जाणार आहे.
नव्याने सजलेल्या या उद्यानात मेरी गो राऊंड, मल्टी अॅक्टिविटी प्ले सिस्टम तसेच विविध प्राण्यांचे पुतळे असणार आहेत. त्यामध्ये डायनासोर व इतर दुर्मिळ प्राणि पाहण्याची सोय असणार आहे.
मशरूम अम्ब्रेला, टू डी आर्ट पेंटिंग वॉल , योगा डे आणि कारंजा अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी या उद्यानात पाहायला मिळतील.