सध्या इको-फ्रेंडली जीवन जगून ग्लोबल वार्मिंगला तोंड देण्याचे दिवस आहेत. स्मार्ट सिटी प्रोजेक्ट मधून शहरात उद्यान निर्मितीचे काम सुरू आहे. बेळगाव शहराला एक चांगले रूप येत आहे .याचबरोबरीने संपूर्ण बेळगाव शहर हिरवेगार करण्याचा संकल्प केला आहे. बेळगावातील आंतरराष्ट्रीय लँडस्केप डिजाइनर कृष्णा चव्हाण यांनी संपूर्ण बेळगाव हिरवळीने नटलेले करण्याचा संकल्प केला आहे .
बेळगावातील टिळकवाडी चे नाथ पै गार्डन यांनी तयार केले.
चव्हाण यांना स्मार्ट सिटी प्रोजेक्ट मधून या कामाची संधी मिळाली. अतिशय कमी वेळात उद्यानाचे काम पूर्ण करून उद्यानाचे स्वरूप त्यानी बदलवले आहे .आता प्रत्येकानेच या तंत्रज्ञानाकडे लक्ष देऊन बदल करून घेण्याची गरज आहे .इकोफ्रेंडली होण्यासाठी हिरवळ गरजेची आहे यासाठी प्रत्येकाने पुढे यावे असे त्यांचे म्हणणे आहे.
आपले स्वतःचे शहर असलेले बेळगाव शहर हिरवळीने नटवून जगात त्याची वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यामुळे स्वतः परिश्रम करण्याची तयारी त्यांनी चालवली आहे .
पाच एकर जागेतील उद्यान फक्त 74 तासांमध्ये तयार करण्याचे काम त्यांनी केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा मोठा पुतळा उभारण्यात आला त्याच्या बाजूलाच त्यांनी हे उद्यान तयार केले. यामुळे विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहेत. प्रत्येक सकाळ आणि संध्याकाळ पाणी घालून उद्यान वाढवायची गरज आता नाही.
आता रेडीमेड उद्यान मिळू शकते. त्यासाठी विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नाथ पै गार्डन मध्ये त्यांनी 50 वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत. अशी काही झाडे आहेत त्याच्यावर फुलपाखरे आकर्षित होऊ शकतात, काही झाडांचा सुगंध पसरू शकतो त्यामुळे उद्यान करताना वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो .ग्रीन बेळगावचे स्वप्न साकार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परदेशातील लोकांनी फक्त उद्याने बघण्यासाठी आणि बेळगावची हिरवळ बघण्यासाठी बेळगावला यावे यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.