कडोली येथे राबविण्यात येत असलेले मास्टर प्लॅन अनेकांच्या मानगुटीवर बसले असून हा विकास की भकास? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कडोली येथील मास्टर प्लॅनमुळे अनेजणाचे संसार उघड्यावर पडले आहेत. आता ही नुकसान भरपाई मिळाली नाहीच यामुळे हा विकास करणाऱ्यांच्या नावे बोंब ठोकण्यात येत आहे
विकासाचे गाजर दाखवून घरे कोसळण्यासाठी करण्यात आलेली घाई संशयाची सुई निर्माण करत आहे. विकास करतो म्हणून गाव भकास करणाऱ्यांमध्ये काही लोकप्रतिनिधी आपला टक्का कमविण्यासाठी हा सारा खटाटोप करत असल्याची माहिती मिळाली आहे. केवळ गावापुरते मास्टर प्लॅन राबवून हे साद्य करण्याचा प्रयत्न का केला जात आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या कामासाठी अडीच कोटी मंजूर झाले आहेत .मात्र ज्यांची घरे या मास्टर प्लॅन मध्ये गेली आहेत त्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार का? की त्यांना आश्वासनाची खिरापत वाटून आपली पोळी भाजून घेणार? हे लवकरच समजणार आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आणून सुखाचा घास खाणाऱ्या नागरिकांना दुःखाच्या खाईत ढकलणाऱ्या या लोकप्रतिनिधीना काय म्हणावे ?त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
कडोली येथील हा विकास अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. हा मास्टर प्लॅन राबविण्यासाठी एका लोकप्रतिनिधीने केवळ आपल्या टक्क्यासाठी या कामाला चालना देण्यासाठी खटाटोप सुरु केल्याचा प्रकार सामोरा आला आहे. ग्राम पंचायत मध्ये बैठक घेऊन याला विरोध झाला होता, मात्र एका लोकप्रतिनिधीचा टक्का अडवा आल्याची माहिती मिळाली आहे.