काल बेळगाव परिससरात विजांचा कडकडाट,गारपीटासह जवळपास दिड ते दोन तास तडाखेबाज अवकाळी पाऊस झाला.पण सुस्त महानगरपालिकेला पाऊस सूरु होण्याआधी सर्व गटारी साफ करुन जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊनये अशी अशी व्यवस्था करायला हवी होती. ते न केल्याने अनेक गटारी तुंबल्या आहेत.
बेळगाव स्मार्टसिटीच्या यादीत मागे पडत २६०/२८० व्या स्थानी गेल्याने निधी नक्की कुठे खर्च होतो याचा जनतेला थांगपत्ताच नसतो.याचे ताजे उदाहरण कालच्या भरपूर पावसाने महात्मा फुले रस्त्यात जमीनीत चर काढून मोठी पाईपलाईन घातली आणी वर थूखपॉलिसी करुन झाकून डांबरी रस्ता केला.पण कालच त्यात अनेक वहान अडकली आणी पाईपलाईन घालून रस्ता करणाऱ्याचे पितळ उघडे पडले.
वास्तविक पहाता तो ठेका ज्या लोकप्रतिनिधीने दिलाय त्याला प्रत्यक्ष बोलावून चांगलीच हजरी घेऊन ठेकेदाराची पुढील सर्व काम बंद करुन त्याला अद्दल घडवायला हवी पण त्याला फार धाडस दाखवाव लागत ते काम चांगल झाल असत माझ्या कार्यकालात ते काम चांगल झालय म्हणून तोरा मीरवला असता.तर असे हलके काम केलेल्यांना जाब विचारुन त्यांना कायमची अद्दल घडवावी अशी जनतेची भावना आहे.
नाहीतर “जनता जाऊदे जिवानिशी कमीशन मात्र आमच्या खिशी” म्हणून आळीमीळी चुपचिळी करत बसायच झाल.तसाच प्रकार जुना पुणे बेंगलोर दुपदरी रस्ता तो करतानां योग्य नियोजन न केल्याने शहापूर,खासबागचे पावसाचे पाणी गटारांतील कचरा,पाणी हे सर्वच त्या नवीन केलेल्या रस्त्यावर येऊन तुंबले आणी त्याची दुर्घंदी येवढी होती कि जाणायेणारे नाकधरुनच ये जा करत आहेत.
सदर रस्ता झाल्यापासून दरवर्षी हिच परिस्थिती आहे. हे पाहूनतरी संबधीत खात्याने बळ्ळारी नाल्यापर्यंत यापुढेतरी अशी दुर्गंधी होत रस्ता खराब आणी जनतेला त्रास होऊनये म्हणून खबरदारी घेण्याची गरज आहे.या रस्त्यातील दुर्गंधी मुळे येडीयुराप्पा मार्ग कोणी नामकरण केलय त्यांना हे अशोभनीय आहे अस कधी वाटलं नसेल ?असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
म्हणून मनपा,लोकप्रतिनिधी,संबंधित खात्याच्या हलगर्जीपणामूळे जनतेच्या जीवाशी खळणाऱ्यांना असे विचारावेसी कि हा महामार्ग आहे कि सांडपाणी मार्ग ?