खोट्या संदेशामुळे कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यात उन्हाळ्यातील तीन महिने हेल्मेट ला बंदी घालण्यात आल्याचा किंवा हेल्मेट वापराबद्दल शिथिलता निर्माण केल्याचा समज पसरला होता.
या फेक मेसेज मुळे माध्यमेही भुलली, मात्र तसे काही नसून हेल्मेट सक्तीचे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. उत्तर कर्नाटकातील बळ्ळारी रायचूर बिदर कलबुर्गी कोप्पळ विजापूर बागलकोट यादगिरी आणि बेळगाव या जिल्ह्यांसाठी हेल्मेट सक्तीत उन्हाळ्याचे अलग तीन महिने शिथिलता असेल असा एक संदेश पसरत होता. हा संदेश पसरल्यानंतर लगेच लोकांनी हेल्मेट वापरणे बंद केले, मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार हेल्मेट सक्तीचे आहे आणि वाहन चालवणाऱ्या प्रत्येकाने त्याचा वापर करायला हवा ,ही काळाची गरज आहे.
बेळगाव चे पोलीस आयुक्त आणि बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख यांनी यासंदर्भात खुलासा केला असून हेल्मेट वापरणे हे अपघाताच्या दृष्टीने महत्त्वाचे असून हेल्मेट वापरावे कोणत्याही मोसमाचा विचार करून हेल्मेट वापरा बद्दल सवलत देता येत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे कोणीतरी चुकीचा संदेश तयार करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून याची दखल घ्यावी. असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे.