मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर या पदावर आरूढ झालेले, गोव्याचे सभापती म्हणून यापूर्वी काम केलेले डॉ प्रमोद सावंत यांचेही बेळगावशी चांगले संबंध आहेत. मनोहर पर्रिकर यांचा जसा बेळगावशी चांगला संबंध होता त्याप्रमाणे डॉ प्रमोद सावंत यांच्याबद्दल बेळगावात आत्मीयता बाळगणारे लोक आहेत.
डॉ प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेचे सभापती म्हणून काम पाहत होते ते देशातील सर्वात तरुण स्पीकर होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांची जागा कोणी घ्यायची यासंदर्भात भाजप नेत्यांची चर्चा सुरू होती आणि डॉक्टर असलेले आणि एक अनुभवी राजकारणी म्हणून मुख्यमंत्रीपदासाठी डॉ प्रमोद सावंत यांची निवड झाली. संघाच्या मुशीत तयार झालेले युवा मुख्यमंत्री म्हणून मान मिळवलेल्या डॉ प्रमोद सावंत यांच्या बेळगाव कनेक्शन बद्दल ही चर्चा ऐकायला मिळत आहेत.
भाजपमधील काही बेळगावचे नेते आणि डॉक्टर प्रमोद सावंत यांचे चांगले संबंध आहेत. मागच्यावेळी एका भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सावंत बेळगावला आले होते. बेळगाव भाजप नेते किरण जाधव यांनी सावंत यांच्या गेल्या दोन्ही निवडणुकात प्रभारी म्हणून प्रचार केला होता त्याचबरोबरीने भाजप कार्यकर्त्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत तसेच इतर मराठी माणसांशी त्यांचे संबंध असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर आणि पुणे येथे झाले आहे ते साखळीचे आमदार असून राणे यांच्या नंतर मराठा समाजाचे झालेले मुख्यमंत्री आहेत.
बेळगाव आणि गोवा आजूबाजूला असल्यामुळे दोन्ही शहरातील व्यक्तीत संबंध असतातच डॉक्टर प्रमोद सावंत हे नवीन मुख्यमंत्रीही बेळगावला आपले म्हणणारे आहेत हेच यातून स्पष्ट होतंय.