एकीकडे कोट्यावधींच्या नफ्यात असणाऱ्या परिवहन महामंडळाच्या आंधळ्या कारभाराचा एक नमुना सामोरा आला आहे. बेळगाव हिंडलगा रोडवर बसची पाठीमागील काच फुटली आहे आणि हा प्रवास तसाच करण्यात येत आहे यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे .
परिवहन महामंडळाच्या क्रमांक तिसऱ्या डेपोमधील ही बस असून कोणत्याच अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे वडापांची वाढती संख्या पाहता बसची वाताहत होत आहे. त्यातच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलण्याचे सोडुन त्यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम करण्यात येत आहे.
सध्या प्रवाशी कमी झालेत म्हणून ओरड सुरू असताना दुसरीकडे धोकादायक वाहतूक करण्यावर परिवहन महामंडळ प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे असे प्रकार रोखून प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे
हिंडलगा रोडवर परिवहन महामंडळाची एक बस प्रवास करीत होती त्या बसची पाठीमागील काच पूर्णपणे फुटली होती त्या बसमसध्ये विध्यार्थी आणि बरेच प्रवाशी होते जर चालकाने ब्रेक मारला तर पाठीमागील त्या फुटलेल्या काचेतून अनेकजण रस्त्यावर कोसळून त्यांचा जीवही गेला असता त्यामुळे अशा बसची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.