के एल एस संस्थेच्या मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागाच्या टीम मेकाट्रॉनने तयार केलेला प्रोजेक्तची केपीआयटी स्पार्कल प्रदर्शनात पहिल्या तीस प्रोजेक्त मध्ये निवड करण्यात आली.
पिंपरी चिंचवड येथे झालेल्या या प्रदर्शनात 1915 प्रकल्प सादर केले होते.यामधून उत्तम तीस प्रकल्पांची निवड करण्यात आली होती.अब्दुल जब्बार खान ,अजय लेंगडे,अंकुर चिटणीस,अजित नावी आणि आयन मुन्शी या चार विद्यार्थ्यांच्या टीम मेकाट्रॉनने सदर प्रकल्प तयार केला होता.
शिलाई मशीनचे तंत्रज्ञान वापरून अन्य काम करताना देखील विद्युत निर्मिती करता येते असा प्रकल्प या टीमने सादर केला होता. ए आय सी टी ई चे अध्यक्ष डॉ अनिल सहस्त्रबुद्धे यांनी स्वतः पाहून याचा स्वाद घेऊन बेळगावातील मुलांच्या या प्रोजेक्टचे कौतुक केलं होतं. इतकेच काय तर पदं विभूषण डॉ रघुनाथ माशेलकर, डॉ पीटर ट्रोपचूच, डॉ कार्ल प्रेरीन डॉ मासाजी मूजियामा यांनीही याचे कौतुक केले आहे.