म ए समिती महिला आघाडीच्या येथील प्रसिद्ध हॉटेल मध्ये गॅस सिलेंडर बदलत असताना अचानक गॅस लिकेज झाला. पण येथे काम करणाऱ्या महिलांनी प्रसंगावधान दाखवून अनर्थ टाळला आहे.
आज सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली. सिलेंडर लिकेज होऊन गॅस बाहेर पडल्याने स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला होता. माला जाधव यांनी हात ठेवून दाबून धरले पण गॅस थांबत नव्हता, जुलेका यांनीही थांबवण्याचा प्रयत्न केला. अखेर सिलेंडर ओढत नेऊन बाहेर जिन्याजवळ घेऊन गेल्या. खाली घेऊन गेल्यावर सिलेंडर उडेल व स्फोट होईल असा धोका निर्माण झाला होता पण काही तरुणांनाही मदत केली व अनर्थ टळला आहे. हॉटेल मध्ये भाकरी साठी गॅस वापरला जातो.
या घटनेत महिलांनी आपण किती धाडसी व सक्षम आहोत हे दाखवून दिले असून याचा आपल्याला अभिमान वाटतो असे महिला आघाडीच्या प्रमुख माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले.
Rip