Sunday, November 17, 2024

/

बेळगाव परिसरात वळीव पावसाचा जोरदार शिडकावा

 belgaum

उष्णतेने नागरिक हैराण होत असताना सोमवारी दुपारनंतर बेळगाव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा शिडकावा झाल्यानंतर वातावरण शांत झाले आहे.
वारा सुटून विजेच्या गडगडाट सह पाऊस येऊ लागला असून त्यामुळे तप्त झालेले वातावरण थंड होण्यास मदत झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात पासूनच उष्णतेत वाढ झाली होती .मार्च महिन्यात उष्णतेने कहरच घातला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत पाण्याची टंचाई जाणवत आहे. बेळगाव सह काही जिल्हे दुष्काळी जिल्हे म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.

First Rain fall 2019

बेळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अडचणीत आलेले असतानाच पावसाने शिडकावा केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आहे. पावसाळा सुरू होण्यास अजून दोन ते तीन महिन्याचा कालावधी आहे. मात्र उष्णता जास्त वाढली की बेळगाव आणि परिसरात दुपारनंतर पाऊस पडतो असा पाऊस वातावरण शांत ठेवण्यासाठी हवा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मार्च शेवटच्या आठवड्यात हा वळीव पाऊस झाल्याने शहरातील वातावरण पुन्हा एकदा थंड झाले होते विशेष करून दक्षिण बेळगाव म्हणजे वडगांव अनगोळ भागात वळीवाचे जोरदार आगमन झाले होते अनेक ठिकाणी परीक्षा संपली असल्याने मुलांनी भिजणे पसंत केले होते.काही प्रमाणात गारा देखील पडल्या होत्या त्यामुळे बेळगावात मोसम सुहाना हुवा अश्या प्रतिक्रिया येत होत्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.