स्वतः मी आणि इतर राजकीय नेते म्हणजे उंदीर आहोत. मतदारांनी उंदराकडे लक्ष देण्यापेक्षा गणपती कडे लक्ष द्यावे, आणि गणपती म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. आम्ही सगळे उंदीर आहोत. म्हणूनच गणपती कडे बघून मतदान करा असे आवाहन केले आहे बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार आणि भाजप नेते संजय पाटील यांनी केले आहे.
सोमवारी चिकोडी लोकसभा मतदारसंघातील उगार खुर्द येथे श्रद्धा भवन येथे आयोजित एक भाजप कार्यक्रमात ते बोलत होते.
काँग्रेसचे कार्यकर्ते विचारत असतील की गेल्या पाच वर्षात भाजपने काय काय केले? त्यांना प्रतिप्रश्न करा की तुम्ही गेल्या 60 वर्षात काय केलं? असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
या सभेत माजी मंत्री शशिकांत नाईक, राजू कागे आदी नेते उपस्थित होते.
भाजपमध्ये घराणेशाही नाही. यामुळेच एक चहा विकणारा पंतप्रधान झाला. असेही संजय पाटील म्हणाले. 300 हुन अधिक खासदारांना निवडून देऊन यावेळी मोदींचे हात बळकट करा असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचा सल्ला दिला आहे.
संजय पाटील हे स्वतः बेळगाव लोकसभा मतदारसंघात इच्छूक उमेदवार आहेत. त्यांनी कुठलाही उमेदवार नगण्य असून निवडणुकीत मोदी हेच मुख्य केंद्रबिंदू आहेत हे आपल्या विधानावरून सांगून दिले आहे. मोदींकडे बघून मतदान करा उंदिराकडे बघून नको हा त्यांचा सल्ला सध्या चर्चेत असून उमेदवारांचे उंदिरपण स्पष्टपणे दिसून येत आहे.
आणि… जर उंदीर कुर्तडणारे असतील तर….?