Wednesday, January 15, 2025

/

आजी माजी पदाधिकाऱ्यांनीही भरावेत अर्ज

 belgaum

‘अबकी बार 101 उमेदवार’… हे अभियान राबवण्याचा निर्णय आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जणांनी उमेदवारी अर्ज भरताना समितीच्या जीवावर लोकप्रतिनिधी झालेल्या आजी आणि माजींनी पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरावेत अशी मागणी होत आहे.मनपा इच्छुक उमेदवारांनो लोकसभा उमेदवारी अर्ज भरुन समितीवरील निष्ठा दाखवून द्या अशी मागणी पहिल्यांदा झाली आहे.

बेळगाव मनपा निवडणूक आली की प्रत्येकांची समितीनिष्ठा ओतप्रोत उफाळून येते. समितीची बैठक असली की कार्यालयात बसायलाही जागा शिल्लक नसते, म्हणून अनेकजन उभारुनच चर्चेत भाग घेतात.जनतेचे मराठी प्रेम आणि समिती निष्ठेपोटी उमेदवार निवडून येतात.मात्र अलिकडील नगरसेवक कधी समिती कार्यालयात फिरकतही नाहीत. किंवा मनपात मराठी जनता तसेच समितीची घोषणा देत सीमाप्रश्नी आपली तळमळ सुध्दा दाखवण्यात कमकुवत ठरतात. त्यामुळे जनतेला पश्चातापाशिवाय दुसर काही उरतच नाही.मात्र अशाना निष्ठावान जनता चांगली ओळखून आहे.

 

येती लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लगेच बेळगाव मनपा निवडणूक होणार आहे.तेंव्हा मध्यवर्ती समितीने 101 समितीतर्फे उमेदवार उभे करुन सीमाप्रश्नी देशाचे मराठी मत जिथे जास्त आहेत तेथील समितीची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकजण इच्छूक असतीलच त्यांनी आता होणाऱ्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज भरुन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतलेल्या धाडसी निर्णयाला साथ देऊन गेली ६३/६४ वर्षे बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात सामील होण्यासाठीच्या लोकलढ्याला तसेच या परिसरातील जनता,शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच्या लढ्याला खंबीर पाठबळ मिळेल.

मराठी भाषकांच्या मतावर निवडून येऊन त्यांच्याच पाठित खंजीर खूपसणाऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांची दुकानदारी बंद करण्यासाठी येत्या बेळगाव मनपा निवडणुकीत इच्छूक असलेल्या प्रत्येक मराठी उमेदवारांनी म.ए.समिती कार्यालयात जाऊन अर्ज भरण्याची तयारी दाखवली तर समितीतर्फे प्रत्येकाचा मनपा निवडणुकीत जाणीवपूर्वक विचार व्हावा अशी आजच्या मध्यवर्तीच्या निर्णयाने जनतेतून जोरदार चर्चा होत आहे.
याचबरोबर आजवर समितीच्या जीवावर आमदार आणि ग्राम पंचायत, तालुका पंचायत तसेच जिल्हा पंचायत व आमदार पदे भोगलेल्या प्रत्येक समीतीनिष्ट व्यक्तीने उमेदवारी अर्ज भरण्याची मागणी होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.