चिकोडी मतदारसंघातील उमेदवारीच्या वाटपावरून भाजपमधील अनेकांमध्ये नाराजी आहे. सर्वात प्रामुख्याने कत्ती बंधू नाराज झाले असून काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रमुख माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा उद्या बेळगावला येत आहेत.
नाराजांची भेट घेऊन ते समजावून सांगणार असून कत्ती आणि जोल्ले यांच्यातील वाद मिटवून समझोता करण्याचा प्रयत्न करणार आहेत .
चिकोडी मतदारसंघासाठी आण्णासाहेब जोल्ले यांना भाजपने तिकीट दिल्यावरून कत्ती बंधूं नाराज आहेत. या नाराजीतून या बंधूंनी काँग्रेसकडे वाटचाल सुरू केली असल्याचा संशय असून असं काही करु नका पक्षातच राहा आणि जोलेंना निवडून द्या अशी भाषा वापरण्यास भाजपने सुरुवात केली आहे.
यासाठी राज्यपक्षप्रमुख येडीयुरप्पा बेळगावला येत आहेत त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश मिळणार हे उद्याच कळणार आहे.
सोमवारी सकाळी ते प्रथम बेळगावला येणार असून हुक्केरी येथील बेल्लद बागेवाडी येथे जाऊन कत्ती बंधूंची भेट घेणार आहेत .तत्पूर्वी रविवारी सकाळी बेळगाव भाजप पदाधिकाऱ्यांनी देखील हुक्केरी मुक्कामी कती बंधूंची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.