कडोली येथे मागील काही महिन्यांपासून अध्यक्षपद रिकामी आहे. प्रभारी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्षा काम पाहत होत्या मात्र आता या निवडीचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 27 मार्च रोजी ही निवडणूक घेण्यात येणार असून आता कोण अध्यक्ष होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
कडोली ग्राम पंचायत मध्ये रस्ता रुंदीकरण करण्यात येत असतानाच याला नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. असे असताना संतापलेल्या नागरिकांना शांत करण्यासाठी अध्यक्षपदाच्या निवडणुकचे गाजर दाखविण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे .
मागील चार वर्षांपासून कडोली ग्राम पंचायत अध्यक्ष म्हणून राजू मायना हे होते. आता चार वर्षांपासून पुरुष अध्यक्ष असल्याने आता महिला सदस्यांला अध्यक्ष करण्याची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. त्यामध्ये 10 महिला सदस्य असून आता महिला अद्यक्ष करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कडोली ग्राम पंचायतीमध्ये अद्यक्ष निवडीचे वारे वाहू लागले असले तरी रस्ता रुंदीकरण करण्यात आल्याने अनेकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच अध्यक्ष निवडीबाबत वादंग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मास्टर प्लॅन बाबत होणारे हेवेदावे आता या निवडीवेळी चांगलेच तापणार असल्याचे दिसून येत आहे.