आगामी 23 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकी साठी बेळगाव लोकसभा मतदार संघातून डॉ व्ही एस साधूनांवर यांना तर चिकोडी मधून विद्यमान खासदार प्रकाश हुक्केरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
शनिवारी 23 रोजी राजी 12 वाजता ए आय सी सी चे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक यांनी या नावांची अधिकृत घोषणा केली आहे.बेळगाव चिकोडी सोबत कर्नाटकातील 18 जागांची उमेदवारी देखील घोषणा करण्यात आली आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघातून माजी खासदार एस बी सिदनाळ यांचे पुत्र शिवकांत सिदनाळ आणि डॉ व्ही एस साधूनांवर या दोघांची नावे हाय कमांड कडे पाठवण्यात आली होती त्या नंतर वन मंत्री सतीश जारकीहोळी आणि जिल्ह्यातील इतर नेत्यांनी साधूंनावर यांच्या नावाला पसंती दिली होती त्यानुसार त्यांना उमेदवारी मिळाली आहे.तर चिकोडी मतदार संघात अपेक्षेप्रमाणे प्रकाश हुक्केरी यांना तिकीट मिळाले आहे.
आता चिकोडीचं भाजप तिकीट कुणाला हेच ठरणे शिल्लक आहे यासाठी रमेश कत्ती आणि अण्णासाहेब जोल्ले यांच्यात जोरदार चुरस सुरू असून कत्ती यांना तिकीट डावलल्यास ते बंडखोरी करण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजप हाय कमांड समोर पेच निर्माण झाला आहे.
कोण आहेत हे साधूंनावर?
डॉ व्ही एस साधूंनावर हे मूळचे बैलहोंगल चे असून लिंगायत समाजातील एक परिचित चेहरा आहे उत्तर कर्नाटकात मोठी शिक्षण संस्था असलेल्या के एल इ शिक्षण संस्थेचे ते संचालक आहेत या शिवाय राणी चन्नम्मा सहकारी पथ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काम केलेले आहे या सर्व बाबी मुळे काँग्रेस हाय कमांड त्यांना पसंती दिली आहे यामुळेच शिवकांत सिदनाळ यांचा पत्ता कट झाला आहे.अंगडी यांना लढत देण्यासाठी काँग्रेसने हा नवीन लिंगायत चेहरा काढला आहे मागील लोकसभेत ज्यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांना उमेदवारी मिळाली होती त्यावेळी साधूंनावर यांनी उमेदवारी साठी जोरदार लॉबिंग केली होती यावेळी तीच लॉबिंग यावेळी कामी आली आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघात टर्निंग वोट बँक समजल्या जाणाऱ्या मराठी भाषिक मतदारांना साधूनांवर हा अपरिचित चेहरा आहे. भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार सुरेश अंगडी यांच्या विरोधात नाराजी आहे पंधरा वर्षाची अँटी इन्कमपनसी आहे त्यामुळे दोन्ही पैकी कोणत्या उमेदवाराला मराठी भाषिकांची मते पडतात त्याचेच पारडे जड ठरणार आहे.
Agar desh ko bachana hai to modi ji ko firse primenister karo Agar desh ko dubana hai to Rahul ji ko primenister banao
Har Har modi Ghar Ghar modi modi ji ko jitwav desh badlega kuch Naya Bharat dekhega Jo desh ko jita o hai modi ji