देव तारी त्याला कोण मारी ही म्हण धारवाड मध्ये चार मजली इमारत कोसळलेल्या घटनेच्या बाबतीत खरी ठरली आहे तब्बल चार दिवस मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या युवक सुखरूप बचावला आहे.धारवाडमध्ये इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली ७५ तास अडकून देखील एक युवक आश्चर्यकारकरित्या बचावला आहे.आज अग्निशामक दलाच्या जवानांनी ढिगारा हटवून आत अडकलेल्या युवकाला बाहेर काढले.
आश्चर्य म्हणजे बाहेर काढल्यावर त्याला कोठेही दुखापत अथवा इजा झाल्याचे आढळून आले नाही.तरीही त्याला वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
हा युवक सौंदत्ती तालुक्यातील चिक्क ऊळ्ळीगेरी येथील असून त्याचे नाव सोमु रामनगौड असे आहे.घडलेल्या दुर्घटनेला ७५ तास उलटले असून अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणखी काही जणांना बाहेर काढण्याचे अग्निशामक दल शर्थीचे प्रयत्न करत आहे.या घटनेत इमारतीचे ढिगारे काढून बचाव कार्य करत असलेल्या अधिकाऱ्यांचे देखील कौतुक होत आहे