बेळगावचे काँग्रेस उमेदवार डॉ व्ही एस साधूंनावर यांनी शक्ती प्रदर्शन करत लोकसभा मतदार संघाची उमेदवारी दाखल केली यावेळी आर टी सर्कल पासून डी सी ऑफिस पर्यंत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी डल्ला मारला असून दोन काँग्रेस नेत्यांची पाकीट मारली आहेत या चोरीत चोरट्यांनी जवळपास पन्नास हजारांचा डल्ला मारला आहे.
काँग्रेस पक्षाच्या मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांचं खिश्यातून 30 हजारांची रोकड तर काँग्रेस प्रचार समितीचे महंतेश मत्तीकोप यांचे 18 हजार रुपये लंपास केले आहेत.खिसे कापूनी दोन्ही पाकिटं ब्लेड मारून लंपास केली आहेत.
मिरवणूक संपताच दोन्ही घटना उघड झाल्या आहेत.या प्रकरणी मार्केट पोलिसांत तक्रार केल्याची माहिती मिळत आहे.