बेळगाव मनपाचे ” स्वच्छ भारत का इरादा” हे गाणे दारोदारी वाजवून संपूर्ण शहराची घाण गोळा करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्याच पदरात घाण आली आहे. त्यांच्या वसाहतीची स्वच्छता आणि सुविधा देण्याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले असून ही परिस्थिती असह्य झाली आहे.
शहराच्या वॉर्ड क्र 40 मधील हनुमान नगर येथे येणारी पी अँड टी वसाहत स्वच्छता कर्मचाऱ्यांची वसतिस्थान आहे. मागील 30 वर्षांपासून या वसाहतीची हीच अवस्था आहे. गटरही नसल्याने आणि असलेली गटारे खराब झाल्याने येथे घाण वाढत आहे.
असलेली गटारे भरून वाहत आहेत. यामुळे दुर्गंधी वाढत आहे. मागील दोन वर्षात येथील जीवन नरक झाले आहे.
दुर्दैवाने निवडून येणारे प्रतिनिधी सुद्धा याकडे डोळेझाक करतात. मनपाने डोळे झाकून घेतले आहेत. आता निवडणुकीत मते मागायला पुन्हा या लोकांच्या दरवाज्यात हे लोक कसे जाणार? की परत खोटी आश्वासनं देऊन परत येणार हे माहीत नाही.