बेळगाव महानगरपालिकेचे नूतन प्रशासक पदाचा कार्यभार नूतन प्रादेशिक आयुक्त तुषार गिरीनाथ यांनी आज स्वीकारला आहे.
बेळगाव महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी राजवटीचा कालावधी संपला पण आरक्षण आणि वॉर्ड पुनर्रचना वरून वाद निर्माण झाल्याने निवडणूक पुढे ढकलली गेली होती. आता निवडणूक होईतोपर्यंत मनपावर प्रशासकांचा कारभार चालणार आहे.
प्रादेशिक आयुक्त पदावर असलेले अधिकारी पी ए मेघन्नावर यांची बदली झाली असून त्यांच्याजागी तुषार गिरीनाथ हे आले आहेत. यामुळे त्यांच्या हाती आता मनपाच्या कारभाराची सूत्रे आली आहेत.
आज मनपा आयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मनपा मधील आरक्षण व वॉर्ड पुनर्रचनेचा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात लागल्यानंतरच निवडणुकीची तारीख जाहीर होईल, तोपर्यंत आय ए एस अधिकारी तुषार गिरीनाथ हेच मनपाचे मुख्य कारभारी असणार आहेत.