कर्नाटकात ऐतिहासिक महत्व असलेल्या घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार करण्याचा भाग्य लाभलेली संस्था म्हणून बेळगाव महा पालिका ओळखली जाते.या महापालिके कडे कर्नाटक सरकारची कायमच वक्रदृष्टी राहिलेली आहे.
अलीकडच्या काही वर्षात या महा पालिकेवर फडकत असलेला भगवा ध्वज करंटया कर्नाटक सरकारने हटवला व बऱ्याच वेळा विकास न केल्याचं कारण दाखवून महा पालिका बरखास्त केली होती त्यामुळेच आपल्या मनाजोगा कारभार चालावा या दृष्टीने पालिकेवर दुराग्रही प्रशासकांची नियुक्ती झाली आहे.नागरिकांनी या निवडीला विरोध करून देखील याकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केले.तीच परिस्थिती आजही कायम असून अलीकडे कर्नाटक सरकारने व राज्य सरकारने आय ए एस ग्रेडच्या व मूळच्या उत्तर प्रदेशच्या तुषार गिरीनाथ यांची प्रशासक पदी नियुक्ती केली आहे.
तुषार गिरीनाथ हे एक अनुभवी व कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात मात्र या अधिकाऱ्यांकडे बेळगाव महा पालिका प्रशासका शिवाय अन्य दोन अतिरिक्त भार सोपवण्यात आले आहेत. वास्तविक बेळगाव सारख्या संवेदनशील शहराच्या महा पालिकेचा प्रशासक पूर्ण वेळ काम करणारा हवा या सगळ्या गोष्टींचा विचार न करता सरकारने अश्या प्रकारचा आदेश करून एक प्रकारे बेळगावच्या नागरिकांची चेष्टाच केली आहे.
तुषार गिरीनाथ यांच्या कडे बेळगाव महा पालिका प्रशासना बरोबरच हुबळी धारवाड महा पालिकेची प्रशासकाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली आहे.या शिवाय त्यांच्या कडे बंगळुरू राज्यधानीतील बंगळुरू शहर पाणी पुरवठा मंडळाच्या अध्यक्ष पदाचा भार सोपवण्यात आला आहे म्हणजेच बेळगाव महा पालिकेचा प्रशासकाचा कारभार बंगळुरूहुन हाताळावा लागणार आहे आपोआपच त्यांचे मुख्य कार्यालय देखील बंगळुरूच रहाणार आहे.अश्या पध्दतीने काम करणे त्यांना शक्य होईल काय?असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आता पर्यंत कर्नाटक सरकारने बेळगाव महापालिकेवर बी एस देसाई, बी एस पाटील,निवृत्त लष्करी अधिकारी एच के शिवानंद,प्रदीप सिंह खरोला,शालिनी रजनीश,पी आर दुभाषी असे जेष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती व त्या करवी पालिकेचा कारभार चालवला यापैकी काही प्रशासकांनी आपल्या कामाची चमक दाखवली पण बी एस पाटील व शालिनी रजनीश यांनी मात्र जनतेच्या इच्छा डावलून पालिके विरुद्ध सरकारला अहवाल पाठविला होता त्यामुळे काही वेळ पालिका बरखास्त झाली होती.
अलीकडेच तुषार गिरीनाथ यांनी सरकारच्या आदेशानुसार अधिकार ग्रहण केले व प्रशासनाला न कळवता पालिकेला भेट दिली अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन माहिती जाणून घेतली या भेटीत माजी महापौर नगरसेवक स्थायी समितीचे अध्यक्ष यांची भेट घेण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही.हे सर्व सोपस्कार पूर्ण करून ते आता तातडीने बंगळुरूला रवाना झालेत बेळगाव live ने त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता ते बंगळुरू ला गेलेत असे समजले.