सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 117 व्या बटालियनमध्ये कार्यरत झाड नावगा (ता. खानापूर) येथील राहुल वसंत शिंदे (वय- 24) या जवानास अखरेची मानवंदना देण्यात आली.रविवारी सकाळी पश्चिम बंगाल मध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तो शहीद झाला होता.
शनिवारी रात्री ड्युटी संपवून कॅम्प कडे परत असतेवेळी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राहुल सह चौघे जण शहीद झाले याची माहिती बी एस एफ अधिकाऱ्यांनी हुतात्मा राहुल यांचे वडील वसंत यांना दिली. तत्पूर्वी कोलकताहून विमान मार्गे त्या नंतर रोड मार्गे खानापूर मंगळवारी सकाळी त्याचे पार्थिव झाड नावगा गावात पोहोचले.
2014 साली बी एस एफ मध्ये भरती झाल्यावर राहुलने पंजाब मधील विशालपूर येथे प्रशिक्षण पूर्ण केले होते काश्मीर पंजाब आणि जम्मूत सेवा बजावल्या नंतर गेल्या वर्षी ऑक्टोबर पासून तो बंगाल मध्ये सेवा बजावत होता. राहुलचा भाऊ देखील इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलात सेवा बजावतोय तर वडील वसंत शिंदे हे शेतकरी आहेत.वसंत यांचे भाऊ मधुकर देखील सैन्यात होते ते निवृत्त झाले आहेत.
मंगळवारी सकाळी नावगे येथे अंतिम संस्कार करण्यात आला खानापूर तहसीलदार विद्याधर गुळगुळी यांनी अंतिम संस्कार तयारी केली होती.पोलीस दलाने हवेत गोळीबार करून मानवंदना दिली.जिल्हा प्रशासनाच्या वतीनं डी सी एस बी बोमनहळळी,जिल्हा पोलिस अधीक्षक सुधीर कुमार रेड्डी,जिल्हा पंचायत सी इ ओ राजेंद्रन,ए सी कविता योगाप्पनांवर आदींनी तर खानापूर तालुक्यातील विविध राजकीय नेत्यांनी देखील आदरांजली वाहिली.तत्पूर्वी सकाळी गावभर मिरवणूक काढण्यात आली यावेळी वीर जवान अमर रहे अश्या घोषणा देण्यात आल्या.