Friday, January 24, 2025

/

अखेर वीर नारीच्या खांद्यावर स्टार्स…

 belgaum

भारती सैन्यात कर्नल पदाच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या भाग्यश्री पाटीलच्या खांद्यावर आज स्टार लागले. अकरा महिन्याच्या खडतर प्रशिक्षणानंतर आज चेन्नई इथ ट्रेनिंग सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. मेजर जनरल रावत यांनी त्यांना स्टार्स प्रदान केले.

भारतीय सैन्य दलात कर्नल पदांवर असलेल्या पतीचे अकाली निधन झाल्यानंतर साहसी अश्या बेळगावच्या कन्येने साहस जिद्द चिकाटीच्या जोरावर लेफ्टनंट ही पदवी प्राप्त करत भारतीय सैन्य दलात रुजू झाल्या आहेत. चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग सेंटर मध्ये सहा महिन्यांचे अत्यंत खडतर प्रशिक्षण पूर्ण करत तिने बेळगावचे नाव उज्वल केलं आहे.

चेन्नई येथील सैन्य अधिकारी प्रशिक्षण केंद्रात यावर्षी 140 जणांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय त्यात 30 महिला आहेत या तीस महिला मध्ये दोन विद्वानी (वीर नारी) प्रशिक्षण पूर्ण केलंय या दोन वीर नारीत बेळगाव शहापूर हट्टीहोळ गल्लीची कन्या भाग्यश्री प्रकाशबापू पाटील यांनी प्रशिक्षण पूर्ण करत लेफ्टनंट ही पदवी मिळवली आहे.

bhagyashree

हे. यापूर्वी त्यांनी अमेरिकेत कमर्शियल पायलटचे प्रशिक्षण देखील पूर्ण केले होते.त्यांचा विवाह मूळचे दिल्लीचे असणारे कर्नल विश्वास कुमार यांच्या सोबत झाला होता मात्र गेल्या दीड वर्षांपूर्वी कर्नल विश्वासकुमार यांचं सेवेत असताना आकस्मिक निधन झालं होत त्यांच्या पश्चात तिने खडतर मेहनत प्रचंड जिद्दीच्या जोरावर परीक्षा उतीर्ण होऊन चेन्नई येथील सैन्य दलाच्या अधिकारी प्रशिक्षण केंद्रात ट्रेनिंग यशस्वी रित्या पूर्ण केलं आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.