बेळगांवचा अष्टपैलू नट शिवराज आण्णासाहेब चव्हाण ,कॉलेज डायरी या चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. बेळगांव समवेत अख्या महाराष्ट्रात कॉलेज डायरी 100 चित्रपट गृहात प्रदर्शीत होणार आहे कॉलेज जीवनातील गहिरी बाजू हा सिनेम्यात दर्शविण्यात आली आहे .
प्रेम, मैत्री,लफडी,शिव्या मारामारी ,व्यसन, रॅगिंग कॉलेज मध्ये चालणार हा सारा कळा बाजार आणि त्याला प्रतिउत्तर देणारे आमचे 6 हिरो त्यातील एक आपला शिवराज सुमीतची भूमिका बाजावतोय . हा सिनेमा वास्तववादि असल्या मुळे क्रूरता आणि शिव्या सिनेमात जशाच्या तश्या घेऊन मराठी प्रेक्षकांना एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा पहावयास मिळणार आहे.
या मराठी चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच पाच भाषांमध्ये गाणी चित्रित केल्या बद्धल वर्ल्ड रेकॉर्ड मिळविला आहे.पियुष मिश्रा , बेंनी डायल, शाल्मली खोलगडे , शान, आनंदी जोशी यान सारख्या दिग्गज गायकांनी आपला आवाज दिला आहे.
गेल्या चार वर्षांपासून शिवराज चव्हाण आणि त्याचा संघ “करुसेडर्स थेटर” बेळगांवच्या रंगभूमीसाठी अविरत झटत आहे . शिवराजला आपण हॅम्लेट(क्लॉडिस), द्रोण(वानर), टेकडी, बॅकस्टेज, त्रिशंकू, मी चौथरा बोलतोय !भुजून(येळ्ळूरी भाषेत 45 मि. सोलो) ,व्यसनावारी , What iFF? या सारख्या प्रायोगिक नाटकांमधून नट आणि दिग्दर्शक म्हणून बघत आलोय . गेल्या वर्षी संपूर्ण पाने बेळगावात शूट झालेल्या “यारा” या चित्रपटाचा शिवराज असिस्टन्ट डायरेक्टर होता, त्याने लोकमत,प्रिलसबरी, बॉस या सारखे व्यावसायिक जाहिराती हि शूट केल्या आहेत , निर्णय,ऋणानुबंध,जिंदगाणा हे त्याचे लघु चित्रपट प्रसिद्ध आहेत .
शिवराज आपल्या बेळगावच्या चव्हाट गल्लीचा असून शेतकऱ्याचा मुलगा आहे . शिवराजचे शालेय शिक्षण मराठी विद्यानिकेतन, गोमटेश मधून E&C डिप्लोमा तर इंजिनीरिंग मराठा मंडळ मधून केले आहे . तांत्रिक शिक्षण घरून हि फक्त जिद्धीपायी शिवराजने बरचकाळ पत्रकारिता हि बजावली आहे. शिवराज ने मराठी नटांच्या यादीत बेळ्गावचेही नाव कोरले आहे . तेव्हा बेळ्गावकरांकडून खूप साऱ्या शुभेच्छा, अभिमान आणि आशीर्वाद ….